

पोलादपुरात बंदुकीसह
१० काडतुसे हस्तगत
विनापरवाना शस्त्र बाळगल्याचा आरोप; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
पोलादपूर, ता. १९ (बातमीदार)ः पोलादपूर शहरातील दांडिया संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी एका पिकअपची झडती घेतली. या झडतीत सुमारे ३० हजार रुपये किमतीची बंदूक आणि १० जिवंत छरा काडतुसे आढळून आली. याप्रकरणी तिघांविरुद्ध पोलादपूर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलादपूर एसटी स्थानकासमोरील आकृती हॉटेलजवळ पिकअप जीपमधील तिघांची हालचाल संशयास्पद वाटल्याने एका तरुणीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने पिकअपची झडती घेतली. या वेळी जीपमध्ये लाकडी बट असलेली सिंगल बोअर बंदूक आणि हिरव्या रंगाची, ‘शक्तिमान एक्सप्रेस’ असे लिहिलेली १० जिवंत काडतुसे आढळून आली. बंदुकीची किंमत ३० हजार रुपये, तर काडतुसांची किंमत १,५०० रुपये असल्याचे नोंद करण्यात आले. शस्त्र बाळगण्याचा किंवा वापरण्याचा परवाना नसल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी प्रथमेश उद्धव निकम (वय ३०) आणि अजित अशोक राजपुरे (वय ३६, दोघेही रा. माणिक प्रभू सुतार कॉलनी, संभाजीनगर, सातारा) यांच्यासह पिकअप जीपच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, रात्रीच्या वेळी विनापरवाना शस्त्र व काडतुसे बाळगण्यामागील नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.