धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी चैत्यभूमी सज्ज

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी चैत्यभूमी सज्ज
Published on: 

धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी चैत्यभूमी सज्ज
आंबेडकरी अनुयायांसाठी पाणी, वैद्यकीय मदतीसह विविध सुविधा
चेंबूर, ता. १९ (बातमीदार) ः धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मंगळवारी (ता. २०) दादर येथील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन परिसरात पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, स्वच्छतागृहे आणि सुरक्षेसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी ९ वाजता आंबेडकर परिवाराच्या वतीने ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ९.१५ ते १० या वेळेत पूजापाठ, भन्ते यांचे प्रवचन तसेच रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर आणि अमन आंबेडकर यांचे मार्गदर्शन होणार आहे.

वैद्यकीय मदत, स्वच्छतागृहांची व्यवस्था
चैत्यभूमी परिसरात अनुयायांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीने उपचार मिळावेत, यासाठी वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून, रुग्णवाहिकाही तैनात ठेवण्यात आल्या आहेत. दूरवरून येणाऱ्या अनुयायांसाठी फिरत्या स्वच्छतागृहांसह अन्य आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. गर्दीचे नियोजन आणि अनुयायांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले आहेत. गर्दीचे व्यवस्थापन आणि शिस्त राखण्यासाठी समता सैनिक दलाचे सुमारे ३०० सैनिक कार्यरत राहणार आहेत.

अनुयायांच्या सोयींना प्राधान्य
“धम्मचक्र प्रवर्तन दिन हा बौद्ध समाजासाठी ऐतिहासिक आणि प्रेरणादायी दिवस आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल होतात. त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी विविध सुविधांचे नियोजन करण्यात आले आहे,” असे चैत्यभूमीचे व्यवस्थापक प्रदीप कांबळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com