इम्रान खानच्या याचिकेवर २६ ऑक्टोबरला सुनावणी

इम्रान खानच्या याचिकेवर 
२६ ऑक्टोबरला सुनावणी
Published on: 

इम्रान खानच्या याचिकेवर
२६ ऑक्टोबरला सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या निदर्शनात सहभागी होऊन परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने (फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस) बजावलेल्या नोटिसीला बॉलीवूड अभिनेता इम्रान खान याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्या याचिकेची न्यायालयाने सोमवारी (ता. १९) दखल घेतली तसेच २६ ऑक्टोबरला सुनावणी घेण्याचे निश्चित केले.

नोटिसीद्वारे इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जाण्याचे आदेश दिले असून, इम्रानची याचिका सोमवारी मुख्य न्या. महेश चंद्र त्रिपाठी आणि न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठापुढे सादर करण्यात आली. इम्रानला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याची मुदत दिल्याने याचिकेवर तातडीने सुनावणीची आवश्यकता असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेवर २६ ऑक्टोबरला सुनावणी सूचीबद्ध केली. इम्रानवर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल आहे का, अशी विचारणा केली. त्यावर इम्रानची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांनी नकारार्थी उत्तर दिले. याप्रकरणी राज्य सरकारलाही प्रतिवादी करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 

परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने पाठवलेल्या नोटिसीला बेकायदा, चुकीची, अत्यंत कठोर आणि कायद्याच्या दृष्टीने अयोग्य असल्याचे इम्रानने याचिकेत म्हटले आहे. इम्रानने ही नोटीस रद्द करण्याची आणि अंतरिम दिलासा म्हणून तिच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याची मागणीही केली आहे. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकाला शांततापूर्ण निदर्शनांत सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करणारी कोणतीही तरतूद सध्याच्या कायद्यात किंवा वैधानिक नियमांमध्ये उपलब्ध नाही, असा दावाही इम्रानने केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com