

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : उन्हाच्या तीव्र झळा आणि पंखाला झालेली दुखापत यामुळे निपचित पडलेल्या नवरंग पक्ष्याला पक्षीमित्रांच्या तत्परतेमुळे जीवदान मिळाले. ठाणे पश्चिमेतील बी कॅबिन परिसरात आढळलेल्या या पक्ष्याची भरत मोरे आणि त्यांचा मुलगा लष्कर मोरे यांनी चार दिवस काळजी घेतली. प्रकृतीत सुधारणा होऊन उडण्यास सक्षम झाल्यानंतर या पक्ष्याला चेंदणी कोळीवाडा बंदर परिसरात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
ठाण्यातील बी कॅबिन परिसरातील नितीन माईनकर यांच्या इमारतीत हा नवरंग पक्षी जखमी अवस्थेत पडलेला आढळला. त्याच्या डाव्या पंखाला दुखापत झाली होती. उन्हाच्या तीव्रतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन तो अशक्त झाला असावा आणि त्यामुळे झाडावरून खाली पडला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. पक्ष्याची अवस्था पाहून माईनकर यांच्या मुलाने त्याच्या खाद्याबाबत इंटरनेटवर माहिती घेतली. त्यानंतर भरत मोरे आणि त्यांचा मुलगा लष्कर यांनी पक्ष्याची सुश्रूषा सुरू केली. चार दिवस त्याला नियमित खाद्य-पाणी देत त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यात आले. योग्य निगा आणि काळजीमुळे पक्ष्याची प्रकृती सुधारली. त्याच्या पंखांत पुन्हा बळ आल्याने त्याला चेंदणी कोळीवाडा बंदर परिसरात सुरक्षित नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.