आधी आराखडा, मग बांधकाम! आधी आराखडा, मग बांधकाम!

आधी आराखडा, मग बांधकाम!
आधी आराखडा, मग बांधकाम!
Published on: 

आधी आराखडा, मग बांधकाम!
धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यासाठी रहिवाशांची सह्यांची मोहीम
धारावी, ता. २० (बातमीदार) ः धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मास्टर प्लॅन सार्वजनिक करावा, पुनर्वसनाचा करार तातडीने करावा आणि रहिवाशांना विश्वासात घेऊनच विकासकामे सुरू करावीत, या मागण्यांसाठी डीआरपी सेक्टर-१ मधील रहिवाशांनी सह्यांची मोहीम राबवली. ‘मास्टर प्लॅन नाही, तर बांधकाम नाही’ असा नारा देत रहिवाशांनी पुनर्विकास प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला. माटुंगा लेबर कॅम्प परिसरात १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी ही मोहीम राबविण्यात आली.
धारावी पुनर्विकास प्रकल्पातील कथित अनियमितता आणि प्रकल्पाची पुरेशी माहिती रहिवाशांना दिली जात नसल्याबद्दल या मोहिमेतून नाराजी व्यक्त करण्यात आली. प्रकल्पाचा संपूर्ण मास्टर प्लॅन, प्रस्तावित इमारतींचे आराखडे आणि पुनर्वसनासंदर्भातील माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. तसेच, रहिवाशांच्या सूचना आणि हरकती विचारात घेऊनच पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे न्यावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्री, अदाणी समूह, धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रशासन आणि रहिवाशांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी मागणीही करण्यात आली. या बैठकीत पुनर्विकासाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करून रहिवाशांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन करण्यात आले.

पुनर्वसन कराराची मागणी
रहिवाशांना पुनर्वसनाबाबत ठोस कायदेशीर हमी मिळावी, यासाठी वैयक्तिक पुनर्वसन करार (पीएएए) तातडीने करावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. पुनर्विकास प्रक्रियेत रहिवाशांच्या घरांचा, उपजीविकेचा आणि भवितव्याचा प्रश्न प्राधान्याने सोडवावा, असेही रहिवाशांनी स्पष्ट केले.

रहिवाशांना विश्वासात घेण्याची मागणी
मोहिमेचे आयोजक रीडन फर्नांडो यांनी रहिवाशांना विश्वासात न घेता पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे नेल्यास पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण होतात, असे मत व्यक्त केले. रहिवाशांच्या हक्कांचे संरक्षण करून आणि त्यांच्या मागण्यांचा विचार करूनच पुनर्विकासाची प्रक्रिया पुढे न्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com