अंबरनाथमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन !

अंबरनाथमध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन !
Published on: 

अंबरनाथमध्ये विकासकामांचा श्रीगणेशा
पाण्याची टाकी, उद्यान सुशोभीकरणासह विविध प्रकल्पांचे भूमिपूजन

अंबरनाथ, ता. २० (वार्ताहर) : अंबरनाथ नगर परिषदेच्या नगराध्यक्षा तेजश्री करंजुले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध नागरी सुविधांशी संबंधित विकासकामांचे भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आला. पाण्याची टाकी, वाहतूक सिग्नल यंत्रणा, उद्यान सुशोभीकरण, व्यायामशाळा आणि बहुउद्देशीय सभागृह अशा कामांचा यात समावेश आहे.

आमदार किसन कथोरे आणि भाजप राज्य परिषद सदस्य गुलाबराव करंजुले-पाटील यांच्या उपस्थितीत पालेगाव येथे पाण्याच्या टाकीच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. पाइपलाइन रस्त्यावरील सीएनजी पेट्रोलपंपाजवळ नवीन वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्याच्या कामाचाही शुभारंभ झाला. रॉयल पार्कजवळ नवीन पाइपलाइन टाकणे, आनंद पार्कमधील उद्यानाचे सुशोभीकरण, शिवगंगानगर येथे बंदिस्त व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृह उभारणे आणि नवीन वडवली येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र बांधणे या कामांचेही भूमिपूजन करण्यात आले.

या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मयुरेश भुजबळ, शहर अभियंता राजेश तडवी, अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले-पाटील, कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले-पाटील, बांधकाम समिती सभापती शैलेश भोईर, नियोजन समिती सभापती महेश फुलोरे यांच्यासह नगरसेवक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

वाढदिवसानिमित्त धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले. प्राचीन शिवमंदिरात अभिषेक, उल्हासनगर येथील गोशाळेत गोपूजन, राममंदिरात नवमी पूजन आणि गावदेवी मंदिरात महाआरती करण्यात आली. आनंद दिघे नाट्यगृहाच्या वर्धापनदिनानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले. तसेच बेघर निवारा केंद्र आणि शहरातील विविध भागांत अभिष्टचिंतन सोहळे पार पडले.

प्रमुख कामे
- पालेगाव येथे पाण्याची टाकी
- पाइपलाइन रस्त्यावर नवीन वाहतूक सिग्नल
- रॉयल पार्कजवळ नवीन पाइपलाइन
- आनंद पार्क उद्यानाचे सुशोभीकरण
- शिवगंगानगर येथे बंदिस्त व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृह
- नवीन वडवली येथे श्वान निर्बीजीकरण केंद्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com