

मुरबाड, ता. २१ (वार्ताहर) : ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न, जमीन मालकी हक्क आणि दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सागरी भूमिपुत्र महासंघाच्या वतीने वेळूक येथे शेतकरी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दोन्ही जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा ठराव संमत करण्यात आला. सरकारने या मागणीची तातडीने दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
मेळाव्यात जमीन मालकी हक्क, शेतकऱ्यांच्या समस्या आणि संघटन बांधणी या विषयांवर चर्चा करण्यात आली. डॉ. कविता वरे-भालके यांनी ‘जमीन मालकी हक्क लढा आणि संघटन बांधणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. जमीन हक्कांबाबत जनजागृती, शेतकऱ्यांच्या प्रश्नांची प्रभावी मांडणी आणि न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे पाठपुरावा करण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. ग्रामीण भागातील शेतकरी, भूमिपुत्र आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता यावेळी अधोरेखित करण्यात आली. जमीन मालकी हक्कांसह ग्रामीण विकासाच्या प्रश्नांवरही मेळाव्यात विचारमंथन झाले. मेळाव्यासाठी जयराम वारघडे आणि चिंतामण वारघडे यांनी विशेष प्रयत्न केले. ‘जल, जंगल, जमीन आमच्या हक्काचे’ आणि ‘ठाणे-पालघर जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित झालेच पाहिजेत’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि दुष्काळग्रस्त घोषणेची मागणी अधिक तीव्र करण्याच्या निर्धाराने मेळाव्याची सांगता झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.