रायगडमध्ये लाखावर रुग्णांची तपासणी

रायगडमध्ये लाखावर रुग्णांची तपासणी
Published on: 

रायगडमध्ये लाखावर रुग्णांची तपासणी
१,४२८ शिबिरांचे आयोजन; आरोग्य अभियानाला प्रतिसाद
अलिबाग, ता. २० (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबरदरम्यान राबविण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ एक लाख एक हजार ८९९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात या कालावधीत एकूण १,४२८ वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्यात आली. हृदयविकार, बालरोग, स्त्रीरोग, अस्थिविकार, नेत्रविकार यांसह विविध आजारांसाठी रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात आल्या. रक्तदान, अवयवदान, गर्भवतींची तपासणी आणि विविध रोगांच्या प्रतिबंधासाठीही विशेष उपक्रम राबविण्यात आले.
या अभियानांतर्गत ५० हजार ६३१ पुरुष, २९ हजार १८१ महिला आणि २२ हजार ८७ बालकांची तपासणी करण्यात आली. एकूण ५,५९६ रुग्णांची ईसीजी तपासणी, तर २,५६९ रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली. ३६३ रुग्णांना अँजिओग्राफी व इतर तपासण्या करण्याचा सल्ला देण्यात आला. १५ रक्तदान शिबिरांत १,०२१ रक्तदात्यांनी सहभाग घेतला, तर ६२ नागरिकांनी अवयवदानासाठी लेखी संमती दिली.
उच्च जोखमीच्या गर्भवतींच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यात आली. तिसऱ्या तिमाहीत हिमोग्लोबिनचे प्रमाण ९.९ पेक्षा कमी असलेल्या २१३ गर्भवतींपैकी २०४ जणींना उपचार देण्यात आले. दुसऱ्या तिमाहीत हिमोग्लोबिन ९.४ पेक्षा कमी असलेल्या १५८ गर्भवतींना, तसेच हिमोग्लोबिन सातपेक्षा कमी असलेल्या ५२ गर्भवतींना उपचार देण्यात आले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत चार हृदयशस्त्रक्रिया आणि अन्य ३४ शस्त्रक्रियांची नोंद करण्यात आली.

ग्रामस्तरावर आरोग्य जनजागृती
जन आरोग्य समितीच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर ११ आणि उपकेंद्र स्तरावर ६२ बैठका घेण्यात आल्या. आयुष विभागातर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित १४ शिबिरांत ५०२ लाभार्थ्यांनी सहभाग घेतला. याशिवाय आरोग्य शिबिरांत ८९२, योग शिबिरांत २११, महिला आरोग्य शिबिरांत २६७ आणि रक्तक्षय व पोषणविषयक शिबिरांत ९२ लाभार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दोन वृक्षारोपण उपक्रमांत १७ झाडे लावण्यात आली.

प्रमाणपत्रांच्या नोंदीला गती
२४ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांशी संबंधित २,२८५ अर्जांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १,५३७ प्रमाणपत्रे मंजूर झाली, तर ७४८ प्रमाणपत्रे नामंजूर झाली.

रक्तक्षय, सिकलसेल तपासणी
रक्तक्षय प्रतिबंधासाठी एकूण ३३ हजार १२४ हिमोग्लोबिन तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये बालके, किशोरवयीन मुले-मुली, प्रजननक्षम वयोगटातील महिला, गर्भवती आणि प्रसूतीनंतरच्या मातांचा समावेश होता. सिकलसेल तपासणी मोहिमेत ८,८०२ लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

क्षयरोग, कुष्ठरोग नियंत्रण
क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत १३२ नवीन क्षयरुग्णांची नोंद झाली. तसेच ४८ ग्रामपंचायतींची टीबीमुक्त ग्रामपंचायत म्हणून अहवालात नोंद आहे. कुष्ठरोग शोधमोहिमेत ६१ नवीन रुग्ण आढळल्याची नोंद करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com