

भातखळकरांचा सामाजिक पुढाकार
दुष्काळग्रस्तांसाठी ८३ लाखांचा निधी
मुंबई, ता. २० (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत कांदिवली पूर्वचे भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या आकुर्ली सेवा फाउंडेशनने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ८३ लाख रुपयांचा निधी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री अशोक नगर येथील लाल माटी मैदानावर हा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या देणगीदारांचे आभार मानले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले. अतुल भातखळकर यांनी मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली असून, भविष्यातही जनहिताच्या विकासकामांना राज्य सरकारचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
आकुर्ली भुयारी मार्गाचे रुंदीकरण आणि मागाठाणे ते गोरेगावदरम्यानचा १२० फूट रुंदीचा विकास आराखड्यातील रस्ता खुला करणे ही महत्त्वाची कामे मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे पूर्ण होऊ शकली. त्यांच्या पाठबळामुळे मतदारसंघातील अनेक विकास प्रकल्पांना गती मिळाली, असे भातखळकर यांनी नमूद केले. उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला. नवरात्रोत्सवाच्या मंडपात ‘ड्रग्जमुक्त मुंबई’चा संदेश देणारे प्रतीकात्मक दहीहंडी प्रदर्शन उभारण्यात आले होते. धार्मिक उत्सवाला सामाजिक जनजागृतीची जोड देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.