

वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : विजयादशमीच्या मुहूर्तावर श्रमजीवी संघटनेने पारंपरिक शस्त्रपूजनाला नवी दिशा देत भारतीय संविधानाची उद्देशिका, अहिंसा आणि संघटन या मूल्यांचे पूजन केले. ठाणे, पालघर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील गाव-पाड्यांमध्ये ‘संवैधानिक शस्त्रपूजन’ आणि सीमोल्लंघनाचा उपक्रम उत्साहात पार पडला.
‘आपले पहिले शस्त्र म्हणजे भारतीय संविधान. त्याच्या पहिल्या पानावरील ‘आम्ही भारताचे लोक’ हे शब्द देशाचे मालक आपणच असल्याची जाणीव करून देतात,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. गावोगावी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि पूजन करण्यात आले. यासोबतच संघटनेचा राजदंड, ध्वज आणि बोधचिन्ह यांचेही पूजन करण्यात आले. राजदंड उपलब्ध नसलेल्या ठिकाणी तीन फुटांच्या बांबूच्या काठीचे प्रतीकात्मक पूजन करण्यात आले. कोणताही मोठा खर्च न करता प्रत्येक वाडी-पाड्यात स्वतंत्रपणे हा उपक्रम राबवण्यात आला. उसगाव येथे श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित, संघटनेच्या अध्यक्ष सीता घाटाळ, श्रमजीवी रयत कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल, संघटनेचे कार्याध्यक्ष बाळाराम भोईर, सरचिटणीस विजय जाधव, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांनी चार प्रमुख प्रतीकांचे पूजन केले. ज्या गावांत संघटनेचे काम पोहोचलेले नाही, तेथे कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. २७ ऑक्टोबरला होणाऱ्या आगामी भव्य मोर्चाच्या प्रचारालाही वेग मिळाला आहे, अशी माहिती संघटनेचे प्रवक्ते चंद्रा यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.