

ऑक्टोबर हीटचा तडाखा; रसवंतीगृहांवर गर्दी
उसाच्या रसाला वाढती मागणी; ऊस आणि बर्फ महागल्याने विक्रेत्यांवर भाववाढीची वेळ
कासा, ता. २१ (बातमीदार) : ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा तडाखा वाढू लागल्याने शहरांसह ग्रामीण भागातील रस्त्यांवर रसवंतीगृहे फुलली आहेत. उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक थंडगार उसाच्या रसाला पसंती देत असल्याने रसविक्रेत्यांच्या व्यवसायाला वेग आला आहे, मात्र उसाच्या खरेदीदरात आणि बर्फाच्या किमतीत वाढ झाल्याने विक्रेत्यांच्या खर्चात भर पडली असून, त्यांना विक्रीचे भाव वाढवावे लागत आहेत.
शहरातील प्रमुख रस्त्यांपासून ग्रामीण भागातील गावखेड्यांपर्यंत हातगाड्यांवर उसाचा रस विकणारे व्यावसायिक दिसत आहेत. काही जण कायमस्वरूपी रसवंतीगृहे चालवतात, तर अनेक तरुण आणि लहान व्यावसायिक उन्हाळ्यातील हंगामी व्यवसाय म्हणून या क्षेत्रात उतरतात. त्यामुळे रसविक्रीच्या माध्यमातून अनेकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.
उसाच्या रसात लिंबू आणि काळे मीठ घालून दिला जाणारा रस ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. काही ठिकाणी लहान ग्लास १० रुपये, तर बर्फ न घातलेल्या रसाचा ग्लास २० रुपये भावाने विकला जात आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने दुपारच्या वेळी रसवंतीगृहांवर ग्राहकांची गर्दी होत आहे.
दरम्यान, नाशिक आणि नगर जिल्ह्यांतून आणला जाणारा ऊस किलोमागे सात ते आठ रुपये भावाने खरेदी करावा लागत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्यातच बर्फाच्या भावातही वाढ झाल्याने रस तयार करण्याचा खर्च वाढला आहे. ऊस खरेदी, वाहतूक आणि इतर खर्चाचा ताळमेळ साधताना विक्रेत्यांना कसरत करावी लागत आहे. वाढत्या खर्चाचा परिणाम विक्रीवर होत असल्याचे व्यावसायिकांनी स्पष्ट केले.
एकीकडे ऑक्टोबर हीटमुळे उसाच्या रसाची मागणी वाढली असताना, दुसरीकडे वाढत्या खर्चामुळे विक्रेत्यांसमोर आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. तरीही उकाड्यापासून तात्पुरता दिलासा देणाऱ्या उसाच्या रसाला नागरिकांची पसंती कायम असून, रसवंतीगृहांच्या माध्यमातून हंगामी रोजगारालाही चालना मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.