विसर्जनानंतर रस्त्यांची स्वच्छता

विसर्जनानंतर रस्त्यांची स्वच्छता
Published on: 

विसर्जनानंतर रस्त्यांची स्वच्छता
कळंबा देवी मंदिर परिसरातील कचरा पालिकेकडून साफ
अलिबाग, ता. २१ (वार्ताहर) : नवरात्रोत्सवाच्या सांगतेनंतर अलिबाग शहरातील रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी उचलला. कळंबा देवी मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेतील दुकानदारांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे रस्त्यांच्या कडेला ढीग साचले होते. पालिकेने तत्परतेने स्वच्छता केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यात १० दिवस भक्तिभावाने आदिमायेचा जागर करण्यात आला. मंगळवारी (ता. २०) देवीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांच्या एक हजार २४५ मूर्ती, २४४ घट आणि १७५ देवींच्या छायाचित्रांचे, तर खासगी स्तरावरील १८९ मूर्ती, तीन हजार २८३ घट आणि १७ छायाचित्रांचे विसर्जन करण्यात आले.
अलिबागमधील कळंबा देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत यात्रा भरते. या यात्रेत खेळणी, खाद्यपदार्थ, कपडे आणि पूजासाहित्याची दुकाने थाटण्यात आली होती. स्थानिक व्यापाऱ्यांसह बाहेरगावाहून आलेल्या विक्रेत्यांचाही यात सहभाग होता. मंगळवारी विसर्जनाच्या दिवशी अनेक व्यापाऱ्यांनी सायंकाळपर्यंत दुकाने आवरली; मात्र काहींनी कचरा रस्त्याच्या कडेला टाकल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली होती.

स्वच्छतेमुळे नागरिकांना दिलासा
बुधवारी (ता. २१) सकाळी नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा उचलून परिसर स्वच्छ केला. सण-उत्सवांनंतर सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी पालिकेने केलेल्या या कार्यवाहीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com