

टोकावडे, ता. २१ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील कोळोशी ग्रामपंचायत हद्दीतील डोंबेरेवाडी येथे पोल्ट्री फार्ममधून पसरणाऱ्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या आदिवासी ग्रामस्थांच्या तक्रारींची अखेर दखल घेण्यात आली आहे. ग्रामस्थांनी टोकावडे पोलिस ठाण्यात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर ‘पोल्ट्रीच्या दुर्गंधीमुळे डोंबेरेवाडी त्रस्त’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाने संबंधित पोल्ट्री फार्मचालकांना तो बंद करण्याची सूचना दिली आहे.
डोंबेरेवाडी गावाजवळ असलेल्या पोल्ट्री फार्ममधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत होता. परिसरात माशांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. आदिवासी वस्तीच्या मध्यभागी पोल्ट्री फार्म सुरू असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी केल्या. तसेच टोकावडे पोलिस ठाण्यात निवेदन देऊन पोल्ट्री फार्म बंद करण्याची मागणी केली. मात्र, प्रश्न मार्गी लागत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढला होता.
अखेर ग्रामस्थांच्या तक्रारी आणि वृत्तपत्रातील बातमीची दखल घेत कोळोशी ग्रामपंचायतीने १९ ऑक्टोबरला संबंधित पोल्ट्री फार्मचालकांना नोटीस बजावली. यापूर्वी ८ ऑक्टोबरलाही आवश्यक उपाययोजना करण्याबाबत नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही योग्य उपाययोजना केल्या नसल्याचे नमूद करत ग्रामपंचायतीने पोल्ट्री फार्म तातडीने बंद करण्याची सूचना दिली आहे. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नोटिशीत देण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.