संस्कारांतून व्यक्तिमत्त्व घडते

संस्कारांतून व्यक्तिमत्त्व घडते
Published on: 

संस्कारांतून व्यक्तिमत्त्व घडते
विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षणाचे मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना संस्कारांचे महत्त्व पटवून दिले
पाली, ता. २१ (वार्ताहर) : संस्कारांमुळेच माणूस घडतो. त्यामुळे प्रत्येकाने संस्कारक्षम जीवन जगले पाहिजे. संस्कारांमुळे आयुष्य अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनते, असे प्रतिपादन आयुष्य व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अंकुश आपटे यांनी केले. चिवे येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ‘सकाळ एनआयई’ (NIE) उपक्रमांतर्गत आयोजित ‘संस्काराचे मोल’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ सनके, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जयवंत गुरव आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र लिमये यांनी ‘सकाळ’च्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
मार्गदर्शन करताना अंकुश आपटे यांनी विद्यार्थ्यांना शालेय जीवनातील संस्कारांचे महत्त्व समजावून सांगितले. आई-वडील आणि शिक्षक आपल्यावर चांगले संस्कार करत असतात. या संस्कारांच्या बळावरच व्यक्तीचे भविष्य आणि आयुष्य घडत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लहानपणापासूनच चांगले विचार, शिस्त आणि योग्य आचरण यांची कास धरावी, असे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात संस्कारांची भूमिका महत्त्वाची असते. आई-वडिलांकडून मिळणारी शिकवण आणि शिक्षकांकडून होणारे मार्गदर्शन यांमुळे विद्यार्थ्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळते. जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ शिक्षण पुरेसे नसून चांगले संस्कारही आवश्यक आहेत, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com