

ठाणे, ता. २१ (बातमीदार) : मराठी भाषा आणि साहित्य क्षेत्रात ४५ वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे ज्येष्ठ कवी व साहित्यिक प्रा. अशोक बागवे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी (ता. २४) ठाण्यात विशेष सोहळा रंगणार आहे. हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता गडकरी रंगायतन येथे होणार आहे.
कविता, ललित गद्य, नाटक, कादंबरी, कथालेखन, समीक्षा, गीतलेखन आणि संत साहित्याच्या अभ्यासातून प्रा. बागवे यांनी मराठी साहित्यविश्वात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. साहित्यिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी अनेक नवोदित लेखकांनाही मार्गदर्शन केले आहे. या सोहळ्यात प्रा. बागवे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या साहित्यिक कार्याला समर्पित गौरवग्रंथासह एकूण नऊ पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमात नाट्य व चित्रपटसृष्टीतील कलाकार त्यांच्या कविता आणि ललित गद्याचे अभिवाचन करणार आहेत. पार्थ थिएटरचे कलाकार ‘आमचे येथे श्रीकृपेकरून...’ या नाटकातील प्रवेश सादर करतील. मंगेश सातपुते यांनी सोहळ्याचे दिग्दर्शन केले आहे.
कार्यक्रमाची सांगता कौशल इनामदार यांच्या संगीत मैफलीने होणार आहे. या सोहळ्याचे निमंत्रक नरेश म्हस्के, हणमंत जगदाळे, प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, अविनाश जाधव, अभिजीत पानसे आणि सुधीर घागस यांनी साहित्य व कलाप्रेमींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम विनामूल्य असून अधिक माहितीसाठी आशीष शिंदे (९३२०६ ६६७६७) यांच्याशी संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.