आशा स्वयंसेविकांचे ठिय्या आंदोलन

आशा स्वयंसेविकांचे ठिय्या आंदोलन
Published on: 

आशा स्वयंसेविकांचे ठिय्या आंदोलन

मुंबई, ता. २१ : महापालिकेत कार्यरत आशा स्वयंसेविकांना दिवाळी बोनस किंवा सानुग्रह अनुदान जाहीर करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या वतीने २४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महापौरांच्या शासकीय निवासस्थानी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. आशा स्वयंसेविकांना गेल्या अनेक वर्षांपासून सानुग्रह अनुदान देण्याची आश्वासने दिली जात आहेत; मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने संघटनेने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

महापालिका क्षेत्रात सुमारे दोन हजार आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. त्यापैकी सुमारे ७०० स्वयंसेविका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत, तर सुमारे १२०० स्वयंसेविकांची नियुक्ती महापालिकेकडून करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण, सुलभ आणि प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आशा स्वयंसेविका अनेक वर्षांपासून अविरत काम करत आहेत. कोरोना काळातही त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस-रात्र सेवा बजावली. त्यांच्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली होती. महापालिकेकडून आरोग्य सेविका आणि बालवाडी सेविकांसह इतर कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाते, मात्र आरोग्य व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या आशा स्वयंसेविकांना या लाभापासून वंचित ठेवले जात असल्याने त्यांच्यावर अन्याय होत असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी बोनस जाहीर करून आशा स्वयंसेविकांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे महापौरांचे लक्ष वेधण्यासाठी २४ ऑक्टोबर रोजी ठिय्या आंदोलन करून आपले गाऱ्हाणे मांडण्यात येणार असल्याचे संघटनेचे सरचिटणीस राजेश सिंह यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com