

पूर्णेकर हत्या प्रकरण
़़़़़़़़़़़़़़़
तपासाची दिशा पुन्हा टल्लीकडे?
२१ दिवसांनंतरही कारण अस्पष्ट; जुन्या वादाच्या अनुषंगाने पोलिसांकडून पडताळणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्येला २१ दिवस उलटूनही हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, तपासात जुन्या वादाच्या अनुषंगाने संतोष कनोजिया उर्फ टल्ली याच्याशी संबंधित बाबींची पडताळणी केली जात असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, पूर्णेकर आणि टल्ली यांच्यात यापूर्वी वाद झाला होता. यातून पूर्णेकर यांनी टल्लीला अपमानित करून मारहाण केल्याचे सांगितले जाते. तसेच, टल्ली याच्या नातेवाइकाने कापूरबावडी पोलिस ठाण्यात पूर्णेकर यांच्या परिचिताविरोधात तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. यातील गुन्हा मागे घेण्यावरूनही संबंधितांमध्ये मतभेद निर्माण झाले होते का, याची पोलिसांकडून पडताळणी केली जात असल्याचे समजते. जुन्या वादाचा पूर्णेकर यांच्या हत्येशी काही संबंध आहे का, या शक्यतेचाही तपास केला जात आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूचित केले, मात्र हत्येमागील उद्देशाबाबत अद्याप ठोस निष्कर्ष समोर आला नाही. त्यामुळे जुन्या वादाच्या आधारे कोणत्याही व्यक्तीचा हत्येत सहभाग असल्याचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. पोलिस तपासातूनच यातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
आज त्या दोघांना न्यायालयात हजर करणार
अटकेतील संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि अमितसिंग उर्फ पपलू यांची गुरुवारी पोलिस कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालय त्यांची पोलिस की न्यायालयीन कोठडीत रवानगी करते, हे स्पष्ट होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.