

वज्रेश्वरीत दसरा उत्साहात साजरा
वज्रेश्वरी, ता. २१ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील झिडके येथे ‘एक गाव, एक उत्सव’ ही ५२ वर्षांची परंपरा जपत दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त सजविलेल्या रथातून राम-सीतेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर रेणुका विद्यालयाच्या प्रांगणात सुमारे १० हजार ग्रामस्थांच्या उपस्थितीत २५ फुटी राक्षसी पुतळ्याचे दहन करण्यात आले. १९७४ पासून झिडके गावात नवरात्रोत्सवात दुर्गादेवीची स्थापना करून दसऱ्याला पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो. दयानंद पाटील, विलास पाटील, गौरू जाधव, दिनकर पाटील, एन. वाय. पाटील, के. डी. पाटील, मधुकर पाटील, कै. गजानन जाधव, सखाराम जाधव आणि ए. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे. दसऱ्याच्या दिवशी तरुण विविध पात्रांच्या वेशभूषेत सहभागी होतात. वाजतगाजत मिरवणूक काढल्यानंतर राक्षसी पुतळ्याचे दहन केले जाते. यंदाच्या पुतळ्यात दृष्ट प्रवृत्ती, भ्रष्टाचार, वाईट विचार, द्वेष, अशिक्षितता, स्त्रीभ्रूणहत्या आणि प्रदूषण यांसारख्या सामाजिक समस्यांचे प्रतीकात्मक चित्रण करण्यात आले होते. या प्रवृत्तींचा त्याग करून चांगल्या विचारांचे सोने लुटण्याचा संदेश या वेळी देण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.