फ्लिपकार्टच्या सणासुदीच्या खरेदीत २२ टक्क्यांची वाढ

फ्लिपकार्टच्या सणासुदीच्या खरेदीत २२ टक्क्यांची वाढ
Published on: 

फ्लिपकार्टच्या सणासुदीच्या खरेदीत २२ टक्क्यांची वाढ
‘बिग बिलियन डेज’ला ग्राहकांचा प्रतिसाद; सौंदर्यप्रसाधने, फॅशनला पसंती

बंगळूर, ता. २१ : फ्लिपकार्टच्या ‘बिग बिलियन डेज’ या ऑनलाइन खरेदी महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. गेल्या वर्षाच्या तुलनेत ऑर्डर्स, विक्री झालेल्या वस्तू आणि खरेदीदारांच्या संख्येत २० ते २२ टक्क्यांची वाढ झाली. युनिक व्हिजिटर्सची संख्या जवळपास १० टक्क्यांनी वाढली. ९ ऑक्टोबरला सुरू झालेल्या या महोत्सवाच्या पहिल्या तासातच प्रत्येक १५ ऑनलाइन खरेदीदारांपैकी एकाने फ्लिपकार्टला भेट दिली. पुढील ११ दिवसांत प्रत्येक १० ऑनलाइन खरेदीदारांपैकी सुमारे नऊ जणांनी या मंचाला भेट दिली.

एकूण खरेदीदारांपैकी जवळपास निम्मे जण जनरेशन झेडमधील होते. सुमारे ६० टक्के ग्राहक टियर-२ आणि त्यापुढील शहरांमधील होते. सौंदर्यप्रसाधने, वैयक्तिक निगा आणि इतर वस्तूंच्या श्रेणीतील खरेदीदारांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली. जीवनशैलीशी संबंधित वस्तूंच्या खरेदीदारांमध्येही १२.५ टक्के वाढ झाली. मोठ्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत पहिल्याच तासात गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्के वाढ झाली. संपूर्ण महोत्सवात महागड्या वस्तूंची मागणी सामान्य दिवसांच्या तुलनेत जवळपास नऊ पट होती. फ्लिपकार्ट मिनिट्स या जलद वितरण सेवेकडे नियमित दिवसांच्या तुलनेत १.७ पट अधिक नवीन ग्राहक आकर्षित झाले. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जबलपूर आणि मेरठ या शहरांमध्ये खरेदीत वेगाने वाढ झाली. लॅपटॉप, गेमिंग टॅब्लेट आणि एअर फ्रायरसारख्या वस्तूंनाही मागणी होती.


विक्रेत्यांनाही फायदा
महोत्सवात सहभागी झालेल्या विक्रेत्यांपैकी ३१ टक्के विक्रेत्यांचा व्यवसाय सामान्य दिवसांच्या तुलनेत दुप्पट झाला. टियर-२ आणि त्यापुढील शहरांमधील विक्रेत्यांच्या व्यवसायात २.१५ पट वाढ झाली. भिवंडीतील विक्रेत्यांच्या व्यवसायात २.६ पट, पानिपतमध्ये २.५ पट, तिरुपूरमध्ये २.१ पट आणि हिसारमध्ये दोन पट वाढ नोंदवण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com