कॅपशिवाय नर्सिंगला प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना शुल्कसवलत नाही

कॅपशिवाय नर्सिंगला प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांना शुल्कसवलत नाही
Published on: 

कॅपविना नर्सिंग प्रवेश महाग

सवलत रद्द; शुल्काच्या १० टक्के जादा रकमेचीही अट

मुंबई, ता. २१ : राज्यातील नर्सिंग पदविका अभ्यासक्रमांसाठी सीईटी सेलच्या कॅप प्रक्रियेतून प्रवेश न घेणाऱ्या विद्यार्थ्यांना फ्रीशिप आणि शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्काच्या १० टक्के रक्कम जमा करावी लागणार असल्याने कॅपशिवाय प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

नर्सिंगच्या कॅप आणि इतर प्रवेशासंदर्भात उच्च न्यायालयात नुकत्या झालेल्या एका सुनावणीदरम्यान हे प्रवेश कॅप प्रवेश प्रक्रियेच्याच माध्यमातून करण्यावर न्यायालयाने भर दिला आहे. राज्यात नर्सिंग एएनएम आणि जीएनएम अभ्यासक्रमासाठी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत कॅप प्रवेश प्रक्रिया लागू आली आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाने व राज्य सामायिक परीक्षा कक्षाने प्रक्रिया अवलंबली होती. याविरोधात खासगी नर्सिंग कॉलेज संघटनेने मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल करून कॅप प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली होती. यावर न्यायमूर्ती जितेंद्र जैन आणि न्यायमूर्ती किशोर सी. संत यांच्या खंडपीठाने दिलेल्या या आदेशामुळे नर्सिंग प्रवेशप्रक्रियेत कॅप पद्धतीचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

कॅप प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छित नसलेल्या खासगी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेश देता येईल, मात्र त्यांना शुल्काच्या १० टक्के रक्कम तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात जमा करावी लागेल, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ही रक्कम दुष्काळ निवारण निधीत जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे कॅप प्रक्रियेबाहेर प्रवेश देताना खासगी महाविद्यालयांना आर्थिक अटीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
------
यापूर्वी प्रवेश घेतलेल्यांना संधी
खासगी नर्सिंग महाविद्यालयांमध्ये यापूर्वी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही कॅप फेरीत सहभागी होण्याची संधी न्यायालयाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील सध्याचा प्रवेश रद्द करून कॅप प्रक्रियेत सहभागी होण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. याबाबत महाविद्यालयांनी नोटीस बोर्डवर सूचना लावाव्यात, तसेच ई-मेल, एसएमएस आणि व्हॉट्सॲपद्वारे विद्यार्थ्यांना वैयक्तिकरीत्या कळवावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com