बी. फार्मसी,फार्म.डी.च्या चौथ्या फेरीत ३ हजार ६६७ विद्यार्थ्यांना संधी

बी. फार्मसी,फार्म.डी.च्या चौथ्या फेरीत ३ हजार ६६७ विद्यार्थ्यांना संधी
Published on: 

फार्मसीच्या चौथ्या यादीत ३,६७७ विद्यार्थ्यांना संधी
मुंबई, ता. २१ : चार वर्षांचा पूर्णवेळ पदवी औषधनिर्माणशास्त्र बी. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या आणि सहा वर्षांचा पूर्णवेळ पदवी फार्म.डी. या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली. या चौथ्या यादीसाठी पाच हजार १२० विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती. त्यापैकी तीन हजार ६७७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. तिन्ही फेऱ्यांमध्ये २७ हजार १२६ विद्यार्थ्यांनी फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे.
राज्यातील ५२८ फार्मसी महाविद्यालयांतील ४७ हजार १९२ जागांपैकी पहिल्या यादीत १६ हजार ७३४, दुसऱ्या यादीत सात हजार ४३२ तर तिसऱ्या यादीत दोन हजार ९६० याप्रमाणे तिन्ही याद्यांत २७ हजार १२६ विद्यार्थ्यांनी फार्मसी महाविद्यालयांत प्रवेश घेतला आहे. चौथ्या यादीसाठी विद्यार्थ्यांना दिलेल्या मुदतीत पाच हजार १२० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार चौथ्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी तीन हजार ६६७ विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे. यामध्ये एक हजार ८७ विद्यार्थ्यांना प्रवेशाची प्रथमच संधी मिळाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संस्थात्मक फेरीचे प्रवेश होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com