महिलांच्या प्रगतीतून राष्ट्राची उन्नती

महिलांच्या प्रगतीतून राष्ट्राची उन्नती
Published on: 

महिलांच्या प्रगतीतून राष्ट्राची उन्नती
सखी पुरस्कार सोहळ्यात महापौर रितू तावडे यांचे प्रतिपादन; विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांचा गौरव
कांदिवली, ता. २२ (बातमीदार) ः महिलांना सन्मान आणि समान संधी दिल्यास समाजाची व राष्ट्राची प्रगती होते, असे प्रतिपादन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले. कांदिवली पश्चिमेतील समता क्रीडा भवनात शैलजा गिरकर फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सखी पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या.
मुंबईच्या माजी उपमहापौर स्व. शैलजाताई गिरकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्यात सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. शैलजाताई गिरकर यांनी सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या जनसेवेचा वारसा पुढे नेणे आवश्यक असल्याचे महापौर तावडे यांनी सांगितले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट, कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी महत्त्वाच्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शैलजा गिरकर फाउंडेशनच्या विश्वस्त क्रांती गिरकर-कुंदर यांनी रविवारी (ता. १८) या सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी आमदार मनीषा चौधरी, माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी शैलजाताईंच्या सामाजिक कार्याच्या आठवणींना उजाळा दिला. धम्मप्रसारासाठी कार्यरत नगररत्न संदीप बनकर, वेटलिफ्टिंगपटू सरिता संजय कदम आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्षा भोसले यांना सखी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात विविध प्रांतांतील नृत्यप्रकार, जागरण-गोंधळ आणि भारतीय जवानांना समर्पित संगीत सादरीकरण झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com