

धाटाव उद्योगांना चालना देणार
रोजगारनिर्मिती, बंद कारखान्यांचे पुनरुज्जीवन यांना प्राधान्य
रोहा, ता. २३ (बातमीदार) : धाटाव औद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्या आणणे, बंद उद्योगांचे पुनरुज्जीवन करणे आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढविण्यावर भर देणार असल्याचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. रोहेकरांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भरत गोगावले प्रथमच आराध्य दैवत श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या सलामीस उपस्थित राहिले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी रोजगार, औद्योगिक विकास, शेतकऱ्यांना मदत आणि २६ गाव पाणी योजनेबाबत भूमिका मांडली. धाटाव एमआयडीसीतील रिकाम्या जागांवर नवीन कंपन्या सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. उद्योगांमुळे रोजगार वाढतो आणि परिसरातील ग्रामपंचायतीही सक्षम होतात, असे त्यांनी नमूद केले.
सलामी सोहळ्यानंतर गोगावले यांनी सामाजिक कार्यकर्ते आप्पा देशमुख यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख घोसाळकर, तालुकाप्रमुख उद्देश वाडकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक विकासातून स्थानिकांना संधी
धाटाव एमआयडीसीतील बंद कंपन्या पुन्हा सुरू झाल्यास आणि नवीन उद्योग आल्यास स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील रिकाम्या जागांचा वापर, बंद कारखान्यांचे पुनरुज्जीवन आणि उद्योगवाढीसाठी ठोस प्रयत्न करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
फोटो कॅप्शन: अप्पा देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर चर्चा करताना पालकमंत्री भरत शेठ गोगावले समवेत माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, माजी नगरसेविका सौ. पूजा पोटफोडे, पं.स.सदस्य सुरेश मगर आदी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.