

जागतिक मंचावर भारताची भूमिका
अन्नसुरक्षा, महिला सक्षमीकरणावर भारताचा भर
मोखाडा, ता. २२ (बातमीदार) : अन्नसुरक्षा, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि डिजिटल सेवांचा विस्तार या क्षेत्रांतील गुंतवणूक शाश्वत विकासासाठी महत्त्वाची असल्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत भारताच्या वतीने अधोरेखित केले. १९ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात झालेल्या दुसऱ्या समितीच्या आणि आर्थिक व सामाजिक परिषदेच्या (इकोसॉक) संयुक्त बैठकीत त्यांनी भारताची विकासविषयक भूमिका मांडली.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ, हवामानपूरक शेती, पौष्टिक अन्नाची उपलब्धता आणि सार्वजनिक अन्नधान्य साठवणुकीच्या प्रश्नावर जागतिक व्यापार संघटनेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज भारताने व्यक्त केली. ‘पीएम पोषण’ योजनेसह भरडधान्यांच्या प्रसारातून अन्नसुरक्षा आणि पोषणाला चालना देण्याच्या भारताच्या प्रयत्नांचाही उल्लेख करण्यात आला. महिलांची आर्थिक स्वायत्तता वाढविण्यासाठी बँकिंग सुविधा, डिजिटल ओळख, थेट लाभ हस्तांतरण आणि महिला स्वयंसहाय्यता गटांना आर्थिक मदत देण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना परवडणारी इंटरनेट सुविधा, डिजिटल साक्षरता आणि सुरक्षित डिजिटल सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
विकसनशील देशांच्या विकासासाठी वित्तपुरवठा, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि क्षमता विकासाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय सहकार्य मजबूत करण्याची गरज भारताने मांडली. ‘दक्षिण-दक्षिण सहकार्य’ माध्यमातून भारत आपला विकासाचा अनुभव इतर विकसनशील देशांसोबत सामायिक करत राहील, अशी भूमिका डॉ. सवरा यांनी स्पष्ट केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.