शिघ्रे ग्रामपंचायतीला क्षेपणभूमीची प्रतीक्षा!

शिघ्रे ग्रामपंचायतीला क्षेपणभूमीची प्रतीक्षा!
Published on: 

शिघ्रे ग्रामपंचायतीला क्षेपणभूमीची प्रतीक्षा!
नदीच्या पुलावर कचऱ्याचे ढीग; रोगराईचा धोका
मुरूड, ता. २२ (बातमीदार) ः मुरूड तालुक्यातील शिघ्रे ग्रामपंचायतीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभूमी नसल्याने शिघ्रे नदीच्या पुलावर आणि पुलाखाली कचऱ्याचे ढीग साचले आहेत. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरली असून, नदीचे पाणी प्रदूषित होण्याबरोबरच रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.
शिघ्रे, वाणदे, नवीवाडी, आदिवासी वाडी आणि नागशेत या गावांतून पूर्वी दररोज सुमारे एक टन कचरा संकलित केला जात होता, मात्र विल्हेवाटीसाठी जागा उपलब्ध नसल्याने गेल्या काही महिन्यांपासून घंटागाडी बंद आहे. परिणामी, नागरिकांकडून नदीच्या पुलाजवळ कचरा टाकला जात आहे. याच परिसरात दशक्रिया विधीसाठी निवारा शेड असून, विविध गावांतील नागरिक धार्मिक विधींसाठी येथे येतात. सायगाव नदीच्या पात्रातही कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.

क्षेपणभूमीसाठी प्रशासनाकडे पाठपुरावा
उपसरपंच हाफिजु कबले यांनी सांगितले की, क्षेपणभूमीसाठी खासगी जागेचा शोध सुरू असून, सरकारी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकारी आणि अलिबाग उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. कचरा व्यवस्थापनासाठी खासगी ठेकेदाराशीही चर्चा सुरू आहे.

घंटागाडी पुन्हा सुरू होणार कधी?
क्षेपणभूमीअभावी बंद पडलेली घंटागाडी पुन्हा सुरू करण्यासाठी जागेचा प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. तोपर्यंत कचरा संकलन आणि विल्हेवाटीची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे असून, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com