कल्याणी हॉस्पिटलला टाळे

कल्याणी हॉस्पिटलला टाळे
Published on: 

कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने कल्याणी हॉस्पिटल बंद करण्याची कारवाई केली आहे. १५ ऑक्टोबरला केलेल्या अचानक तपासणीत रुग्णालयात एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे आढळले. तसेच अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्राची मुदत संपली होती, जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी अधिकृत संस्थेची परवानगी घेतलेली नव्हती आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेला परिचारिका वर्गही उपलब्ध नव्हता.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत सोनोग्राफी केंद्रे, रुग्णालये आणि बोगस डॉक्टरांविरोधात तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १५ ऑक्टोबरला वैद्यकीय आरोग्य मुख्यालयातील शहर क्षयरोग अधिकारी डॉ. विनोद दौंड आणि खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपाली मोरे यांनी कल्याणी हॉस्पिटलला अचानक भेट दिली. तपासणीदरम्यान रुग्णालयात रुग्णांची तपासणी करण्यासाठी एकही डॉक्टर उपस्थित नसल्याचे निदर्शनास आले. अग्निशमन ना हरकत प्रमाणपत्राची वैधता संपली होती. जैववैद्यकीय कचरा उचलण्यासाठी अधिकृत संस्थेची परवानगीही घेतलेली नव्हती. याशिवाय, आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेला परिचारिका वर्ग उपलब्ध नसल्याचे आढळले. या त्रुटी दूर करण्यासाठी यापूर्वी निर्देश देऊन मुदतही देण्यात आली होती. मात्र, रुग्णालय व्यवस्थापनाने निर्धारित मुदतीत आवश्यक पूर्तता केली नव्हती.
महापालिकेच्या प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सपना रामोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वारंवार सूचना देऊनही त्रुटी दूर न केल्याने रुग्णालय बंद करण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधा, अग्निसुरक्षा, जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन आणि पात्र कर्मचाऱ्यांची उपलब्धता याबाबतचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com