पनवेलची कोंडी सुटली

पनवेलची कोंडी सुटली
Published on: 

पनवेलची कोंडी सुटली
सणासुदीतील गर्दीवर नियंत्रण; फूलविक्रेते आणि वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था
नवीन पनवेल, ता. २२ (बातमीदार) : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळात पनवेल शहरातील प्रमुख चौकांमध्ये फुले खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या. नागरिकांच्या सूचना आणि संबंधित विभागांच्या सहकार्याने पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतुकीचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे गर्दीच्या काळात वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत झाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्नाळा सर्कल आणि उरण नाका परिसरात दरवर्षी सणासुदीच्या काळात नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. ही समस्या सोडविण्यासाठी पनवेल शहर पोलिस ठाणे, पनवेल महापालिका, महापौर नितीन जी. पाटील, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक आणि पत्रकार यांच्याशी चर्चा करण्यात आली. संबंधित परिसराची पाहणी करून आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या.

फूलविक्रेते आणि वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था
भाऊराव पाटील चौक ते कर्नाळा भाजी मार्केट परिसरात फूलविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागेचे नियोजन करण्यात आले. दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. तसेच आवश्यक ठिकाणी एकेरी वाहतूक लागू करून रस्त्यांवरील अडथळे कमी करण्यावर भर देण्यात आला.

नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन
वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी नागरिकांच्या सूचनांचा विचार करण्यात आला. वाहनचालकांनी निर्धारित पार्किंगचा वापर करावा आणि रस्त्यावर वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन करण्यात आले. पोलिस, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या उपाययोजनांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com