‘नमस्ते’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईच्या कामगिरीचे केंद्र सरकारकडून कौतुक

‘नमस्ते’ उपक्रमांतर्गत नवी मुंबईच्या कामगिरीचे केंद्र सरकारकडून कौतुक
Published on: 

‘नमस्ते’ उपक्रमात नवी मुंबईचा गौरव
महिला स्वच्छताकर्मींना पीपीई किट्सचे वाटप; उद्योजकतेसाठी प्रोत्साहन
नवी मुंबई, ता. २२ : स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या ‘नमस्ते’ उपक्रमातील कामगिरीचे केंद्र सरकारकडून कौतुक करण्यात आले. या उपक्रमांतर्गत महिला स्वच्छताकर्मींना पीपीई किट्सचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. तसेच महिलांना उद्योजकतेकडे वळवून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय आणि सामाजिक न्याय व अधिकारिता विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘नॅशनल ॲक्शन फॉर मेकनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टीम’ अर्थात ‘नमस्ते’ उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाच्या राज्य व्यवस्थापक प्रियंका गांगुर्डे यांनी महापालिका मुख्यालयाला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. नवी मुंबईच्या कार्यसंस्कृतीचे कौतुक करताना त्यांनी महिला स्वच्छताकर्मींना भविष्यात यशस्वी उद्योजक बनण्याचे आवाहन केले.
सुका कचरा संकलन केंद्रांच्या माध्यमातून स्थानिक महिलांना शाश्वत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, अशी सूचनाही गांगुर्डे यांनी केली. स्वच्छताकर्मींना सुरक्षा साधने आणि कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली.
महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. अजय गडदे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी राजूसिंह चव्हाण, स्वच्छता अधिकारी किरण सोळसकर, अभियंता वैभव देशमुख आणि स्त्री मुक्ती संघटनेच्या प्रमुख वृषाली मगदूम यांच्यासह अधिकारी व महिला स्वच्छताकर्मी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com