

सीए परीक्षेत मुंबईचा नील शाह देशात अव्वल
नाशिकच्या साक्षी चांडकचेही घवघवीत यश
मुंबई, ता. २२ : ‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या वतीने (आयसीएआय) सप्टेंबरमध्ये घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्स (सीए) इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. २२) जाहीर करण्यात आला. या परीक्षेत मुंबईचा नील शाह ८३.६७ टक्के गुण मिळवत देशात अव्वल आला आहे. नाशिकच्या साक्षी चांडक हिनेही ८३.६७ टक्के गुण मिळवत मुलींमध्ये पहिली आली.
‘आयसीएआय’ने जाहीर केलेल्या गुणवत्ता यादीत नील आणि साक्षी यांनी प्रत्येकी ५०२ गुण मिळवले आहेत. चेन्नईच्या व्ही. श्रुतीने ४९२ गुणांसह ८२ टक्के गुण मिळवत देशात दुसरा क्रमांक पटकावला, तर सुरतच्या प्रेम अग्रवालने ४९० गुणांसह ८१.६७ टक्के मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.
----
१३.२१ टक्के निकाल
सीए इंटरमिजिएट परीक्षेत एकूण १४ हजार ८१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गट-१ची परीक्षा एक लाख ३०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २३ हजार २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, यशस्वीतेची टक्केवारी २३.१४ आहे. गट-२ची परीक्षा ६८ हजार ४०० विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी १२ हजार ९३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या गटाची उत्तीर्णतेची टक्केवारी १८.९२ आहे. दोन्ही गटाची परीक्षा दिलेल्या ३८ हजार ३३९ विद्यार्थ्यांपैकी पाच हजार ६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकत्रित निकाल १३.२१ टक्के लागला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.