

एम.फार्मसी, फार्म.डी.च्या
चौथ्या यादीत ४,१३५ विद्यार्थ्यांना संधी
मुंबई, ता. २२ : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी दोन वर्षांचा पूर्ण-वेळ पदव्युत्तर औषधनिर्माणशास्त्र एम. फार्मसी या अभ्यासक्रमाच्या व तीन वर्षांचा पूर्ण-वेळ पदव्युत्तर फार्म.डी. (पी.बी.) या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या जागावाटपाची चौथी यादी जाहीर करण्यात आली. या यादीसाठी पाच हजार ६४० विद्यार्थ्यांनी पसंती दाखविली होती, त्यापैकी चार हजार १३५ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे. राज्यातील एम. फार्मसी महाविद्यालयातील नऊ हजार २३३ जागांपैकी आजपर्यंत तिन्ही फेरीत मिळून चार हजार ६९२ विद्यार्थ्यांनी एम.फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. चौथ्या यादीसाठी विद्यार्थांना दिलेल्या मुदतीत पाच हजार ६४० विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरले होते. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा विचार चौथ्या यादीसाठी करण्यात आला. या विद्यार्थ्यांपैकी चार हजार १३५ विद्यार्थ्यांना चौथ्या यादीत प्रवेशाची संधी उपलब्ध झाली आहे.
ज्या विद्यार्थ्यांना चौथ्या फेरीमध्ये महाविद्यालय मिळाले आहे, त्या विद्यार्थ्यांनी आता दिनांक २४ ऑक्टोबरपर्यंत मिळालेल्या महाविद्यालयामध्ये प्रत्यक्ष हजर राहून आवश्यक ती कागदपत्रे सादर करून व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. यानंतर २५ ऑक्टोबर ते २९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान संस्थात्मक फेरीचे प्रवेश होतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.