भिवंडीत ऑनलाइन बेटिंग,गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा भिवंडी पोलिसांनी केला पर्दाफाश; १० जणांना अटक

भिवंडीत ऑनलाइन बेटिंग,गेमिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा भिवंडी पोलिसांनी केला पर्दाफाश; १० जणांना अटक
Published on: 

भिवंडीत ऑनलाइन फसवणूक;
मुंबईतील १० जणांना अटक

भिवंडी, ता. २२ (वार्ताहर)ः ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील टोळीचा भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी १० आरोपींना अटक केली असून, ३२ मोबाईल फोन, ४९ एटीएम कार्ड, ४० सिम कार्ड, चार लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
भगवान दास याने १७ ऑक्टोबर रोजी वर्क फ्रॉम होमचे प्रलोभन दाखवत भिवंडीतील तक्रारदारासह त्याच्या सात मित्रांकडील बँक पासबुक, एटीएम, सिम कार्ड, चेकबुक याचा तपशील स्वतःकडे घेतला. नंतर त्यांचा विश्वासघात करून त्यांच्या बँक खात्यांचा उपयोग गेमिंग साईड करिता केला. त्या खात्यांचा वापर करत आरोपीने आर्थिक व्यवहार केले. याबाबत पोलिसांनी रॉयल पाम आयलंड या इमारतीत छापा मारत अनिकेत यादव (२४), रमेश मंडळ (वय २६, दोघे रा. छत्तीसगड), अखिलेश यादव, (वय २४ रा. झारखंड), कुंदन यादव, (वय २१, रा. बिहार), राजाराम राऊत (वय २६, रा. झारखंड) अतिश यादव (वय २०, रा. बिहार), अशोक यादव, (वय २८, रा. बिहार राज्य), दिलीप यादव (वय २८, रा. बिहार), जितेंद्र कुमार यादव, (वय २२, रा. बिहार), संटू यादव, (वय २८ रा. बिहार) अशा विविध राज्यातील १० आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com