आगवनचा रस्ता उजळला

आगवनचा रस्ता उजळला
Published on: 

आगवनचा रस्ता उजळला

ग्रामस्थांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण

पालघर, ता. २२ (बातमीदार) : आगवन गावातील मुख्य रस्त्यावर प्रकाशव्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी होणारी गैरसोय आता दूर होणार आहे. अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत गावातील सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या मुख्य रस्त्यावर पथदिवे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची गेल्या तीन ते चार वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली असून, रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.
आगवनमधील मुख्य रस्त्यावर पथदिवे नसल्याने महिला, विद्यार्थी, शेतकरी आणि ज्येष्ठ नागरिकांना रात्रीच्या वेळी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामस्थांची ही समस्या लक्षात घेऊन कंपनीने पथदिवे उभारण्याचा उपक्रम राबवला. या सुविधेमुळे रस्त्यावरील अंधार दूर होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या प्रकल्पाचे उद्घाटन अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्राचे मुख्य व्यवसाय अधिकारी दीपक पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी भावेन शेठ, नित्यानंद तिवारी, कैलास नेरकर, स्नेहल जोशी आणि अविनाश फाटक उपस्थित होते. अदाणी डहाणू औष्णिक ऊर्जानिर्मिती केंद्र आणि अदाणी फाउंडेशनच्या माध्यमातून परिसरात शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कौशल्य विकास, पर्यावरण संवर्धन आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. आगवनमधील पथदिवे प्रकल्पामुळे ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात सुरक्षितता आणि सुविधा वाढण्यास मदत होणार असून, या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com