नेवाळीत एटीएम फोडून १३ लाखांची रोकड लंपास

नेवाळीत एटीएम फोडून १३ लाखांची रोकड लंपास
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : नेवाळी नाका परिसरात चोरट्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून १३ लाख ११ हजार ९०० रुपयांची रोकड लंपास केली. गुरुवारी (ता. २२) पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे, हे एटीएम नेवाळी पोलिस चौकीपासून अवघ्या ५० मीटर अंतरावर आहे. चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला असून, फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
अंबरनाथ-काटई महामार्गावरील नेवाळी नाका येथे हे एटीएम आहे. चोरट्यांनी कटर मशीनच्या साह्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रोकड असलेला कॅश बॉक्स काढून नेला. या प्रकारात एटीएम मशीनचेही नुकसान झाले आहे. मशीनमधील १३ लाख ११ हजार ९०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी उल्हासनगर येथील हिललाइन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा माग काढण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक एस. बी. सुर्वे करीत आहेत. पोलिस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एटीएममध्ये एवढी मोठी चोरी झाल्याने परिसरातील नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन चोरीचा छडा लावण्याचे आव्हान हिललाइन पोलिसांसमोर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com