

मुंबईतील दीपक टॉकीज जमीनदोस्त
मुंबई, ता. २३ : मुंबईच्या बदलत्या चेहऱ्यासोबत शहरातील जुन्या खुणाही पुसल्या जात आहेत. लोअर परळमधील ‘दीपक टॉकीज’ हे जुने चित्रपटगृह पाडण्यात आले असून, त्याच्या जागी नवी इमारत उभारण्यात येणार आहे. एकेकाळी गिरणगावातील कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मनोरंजनाचा भाग असलेल्या या चित्रपटगृहाचा प्रवास संपष्टात आहे.
दीपक टॉकीजचा इतिहास मुंबईतील जुन्या एकपडदा चित्रपटगृहांच्या परंपरेशी जोडलेला आहे. लोअर परळ, प्रभादेवी आणि आसपासच्या परिसरातील प्रेक्षकांसाठी हे चित्रपटगृह चित्रपट पाहण्याचे एक प्रमुख ठिकाण होते. मल्टिप्लेक्सची वाढ, बदलती प्रेक्षकसंख्या आणि परिसरातील झपाट्याने झालेला विकास यामुळे एकपडदा चित्रपटगृहांचे गणित बदलले. दीपक टॉकीजही काही काळ बंद होते. त्यानंतर ते पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटगृहात रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपट दाखवण्यात आले. विशेष चित्रपट प्रदर्शने आणि महोत्सवांच्या माध्यमातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न झाला. मात्र या प्रयत्नांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपटगृह पुन्हा बंद झाले. दीपक टॉकीजची जागा आता नव्या बांधकामासाठी वापरली जाणार असल्याने त्या परिसराच्या जुन्या आठवणींशी जोडलेली आणखी एक वास्तू नाहीशी झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.