

वसईत गॅस सिलिंडरचा काळाबाजार
अन्नपूर्णा गॅस एजन्सीच्या मालकासह सहा जणांवर कारवाई
नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : ग्राहकांच्या घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगसाठी मिळणाऱ्या ओटीपीचा कथित गैरवापर करून सिलिंडरचा काळाबाजार आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अन्नपूर्णा गॅस एजन्सीवर कारवाई करण्यात आली आहे. वसई पुरवठा निरीक्षण अधिकारी भागवत सोनार यांनी छापा टाकून, एजन्सीशी संबंधित मालक, व्यवस्थापक आणि इतर व्यक्तींसह एकूण सहा जणांविरोधात वसई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
वसई बस डेपो परिसरात गॅस सिलिंडरचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारीवरून तपासणी पथकाने अन्नपूर्णा गॅस एजन्सीवर छापा टाकला. तपासणीदरम्यान, मागील गॅस सिलिंडरची आवक-जावक, ऑफलाइन व ऑनलाइन रजिस्टर, ग्राहकांना करण्यात आलेल्या सिलिंडर वितरणाच्या नोंदी व डिलिव्हरीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात काही ग्राहकांच्या नावावर सिलिंडरची डिलिव्हरी दाखवण्यात आली होती, मात्र संबंधित ग्राहकांनी अशा प्रकारचे बुकिंग केले नसल्याचे समोर आले. ग्राहकांच्या गॅस बुकिंगच्या ओटीपीचा गैरवापर करून सिलिंडर इतरत्र विक्री केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी शरद वालावलकर, सुमित वालावलकर, जयकुमार वालावलकर, विजयकुमार वालावलकर, सेल्स मॅनेजर आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनशी संबंधितांविरोधात गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.