बागेश्वर धाम सनातन मठात डिसेंबरमध्ये सामूहिक विवाह सोहळा

बागेश्वर धाम सनातन मठात डिसेंबरमध्ये सामूहिक विवाह सोहळा
Published on: 

भिवंडी, ता. २५ (बातमीदार) : येथील श्री बागेश्वर धाम सनातन मठात ९ डिसेंबरला ५१ वधूंसाठी सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. २४) मठाच्या आवारात स्वयंसेवक आणि भाविकांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मोठ्या संख्येने पुरुष व महिला भाविक उपस्थित होते. सर्वांनी मिळून हा सोहळा यशस्वी करण्याचा संकल्प केला.
संस्थेद्वारे सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. उपस्थितांना कार्यक्रमाचे स्वरूप आणि नियोजनाची माहिती देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू कुटुंबांना त्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मदत करणे, तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्याद्वारे समाजात परस्पर सहकार्य व समर्पणाची भावना रुजवणे असल्याचे मठाचे व्यवस्थापक प्रशांत शुक्ला यांनी स्पष्ट केले. आयोजकांनी सर्व सनातनी बांधवांना आणि नागरिकांना या उदात्त कार्यासाठी शारीरिक श्रम आदी सेवाभावी वृत्तीतून योगदान देण्याचे आवाहन केले आहे. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी श्री बागेश्वर धाम सनातन मठ, भिवंडीच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com