

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : शहराच्या हवेत वाढणाऱ्या प्रदूषणाने नागरिकांच्या श्वासाची चिंता वाढवली आहे. ऑक्टोबरच्या सलग चार आठवड्यांत हवेचा दर्जा खालावलेलाच असून, खासगी मापन यंत्रणांच्या नोंदीनुसार शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०७ पर्यंत पोहोचला आहे. सूक्ष्म धूलिकणांच्या वाढत्या प्रमाणामुळे शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उल्हासनगर शहरातील हवेची गुणवत्ता ऑक्टोबरच्या सलग चार आठवड्यांत खालावलेली राहिल्याचे खासगी हवा मापन यंत्रणा आणि अभ्यासकांच्या नोंदींतून समोर आले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, या काळात उल्हासनगरचा हवा गुणवत्ता निर्देशांक १२५ ते २०७ दरम्यान नोंदवण्यात आला. सातत्याने समोर येणाऱ्या या नोंदींमुळे शहरातील वायुप्रदूषणाची स्थिती तपासण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.
२४ ऑक्टोबर रोजी उल्हासनगर शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक २०७ इतका नोंदवला गेला. हवेतील पीएम २.५ कणांची पातळी ९६, तर पीएम १० कणांची पातळी १२० पर्यंत गेला आहे. हवेच्या गुणवत्तेबरोबरच सूक्ष्म धूलिकणांच्या प्रमाणाकडेही लक्ष देण्याची गरज या आकडेवारीतून पुढे आली आहे. मात्र, ही आकडेवारी खासगी यंत्रणांच्या नोंदींवर आधारित आहे. मापनाची ठिकाणे, वेळा, धूलिकणांच्या प्रमाणाची एकके आणि निर्देशांकासाठी वापरलेले निकष स्पष्ट होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिकृत मापनाशी पडताळणी केल्यानंतरच शहरातील प्रदूषणाची श्रेणी आणि तीव्रता नेमकेपणाने सांगता येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.