

अलिबागमधील विकासकामांचा आढावा
समुद्रकिनारा, बाजारपेठांसह विविध प्रकल्पांची पाहणी; दर्जेदार कामांसाठी सूचना
अलिबाग, ता. २५ (वार्ताहर) : शहरातील नागरिक आणि पर्यटकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या विकासकामांचा नगर परिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी पाहणी करून आढावा घेतला. कामे नियोजनबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.
अलिबाग समुद्रकिनारी सुरू असलेल्या खुल्या रंगमंचाच्या कामाची तसेच तेथील रणगाड्यांच्या रंगकामाची त्यांनी पाहणी केली. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आकर्षक आणि सुरक्षित सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. श्रीबाग स्मशानभूमी परिसरात काळी-पिवळी टॅक्सी उभी करण्यासाठी सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी माहिती घेतली. तसेच म्हाडा कॉलनीतील ‘आपला म्हाडा’ नामकरणाच्या कामाची पाहणी करण्यात आली.
बाजारपेठांच्या कामांवरही लक्ष
नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी प्रशांत नाईक यांच्यासमवेत मासळी बाजार आणि भाजी मंडईच्या इमारतीच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. या प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती घेऊन नागरिकांच्या गरजांनुसार सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात आला.
शहरातील पर्यटनस्थळे, बाजारपेठा आणि मूलभूत सुविधांचा समतोल विकास साधून अलिबाग अधिक सुंदर, सुविधायुक्त आणि पर्यटकाभिमुख बनविण्यासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.