

नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकरच बैठक; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
१३ वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन; बाळाराम पाटील यांचा पाठपुरावा सुरूच
पनवेल, ता. २५ (बातमीदार) ः नैना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी नैना प्रकल्पग्रस्त उत्कर्ष समिती, पनवेल यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, नैनाबाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लवकरच एक विशेष बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री भरत गोगावले आणि खासदार श्रीरंग बारणे यांनाही निवेदन देऊन नैना प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी, न्याय्य हक्क आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक व्हावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. याप्रसंगी बाळाराम पाटील यांच्यासह काशीनाथ पाटील, वामन शेळके, तालुका चिटणीस राजेश केणी, सभापती देवेंद्र मढवी, मनीषा चोरघे, नंदकुमार पाटील आणि शेखर शेळके आदी उपस्थित होते.
गेल्या १३ वर्षांपासून नैना प्रकल्पग्रस्त शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत आहेत. त्यांच्या जमिनी, हक्क आणि भवितव्याशी संबंधित प्रश्नांना न्याय मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत राहू तसेच शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आमचा संघर्ष कायम सुरू राहील, असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.