

भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : शहर परिसरात घडलेल्या तीन स्वतंत्र रस्ते अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले आहेत.
पहिली घटना ठाणे-नाशिक महामार्गावर, आऊटलेट मॉलसमोर घडली. ओवेदुल्ला कयमुल हक (वय ४५) हे दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना त्यांना एका कंटेनर ट्रकने धडक दिली असता त्यांचा मृत्यू झाला. कोनगाव पोलिसांनी याप्रकरणी कंटेनरचालक जावेद कलामुद्दीन खान (३२, रा. बलरामपूर, उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दुसरी घटना ठाणे-नाशिक महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर भूमी वर्ल्डजवळ घडली. २३ वर्षीय यश विश्वनाथ म्हस्के हा मोटारसायकल चालवत असताना, समोरून आलेल्या टेम्पोने त्याच्या गाडीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. टेम्पोचालक रक्षाराम रामदेव मौर्य (२२, रा. टेमघर) याच्याविरुद्ध कोनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
तिसरी घटना मानकोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर, अप्पर लोढा ब्रिजजवळ घडली. शशी सुरेश शेट्टी (वय १८) हा त्याचा मित्र प्रणव शेट्टीसोबत दुचाकीवरून जात असताना, मागून आलेल्या एका दुचाकीने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात दोघे तरुण जखमी झाले, तर त्यांच्यासोबत असलेला साहिल दोशी (१९, रा. पांडुरंगवाडी, डोंबिवली) याचा मृत्यू झाला. नारपोली पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.