प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी पोलीस ठरला देवदूत; रिक्षातच सुखरूप प्रसूती!

प्रसूती वेदनांनी विव्हळणाऱ्या महिलेसाठी पोलीस ठरला देवदूत; रिक्षातच सुखरूप प्रसूती!
Published on: 

रिक्षात महिलेची सुखरूप प्रसूती
पोलिस कर्मचारी, डॉक्टरांच्या तत्परतेमुळे बाळाचा जन्म

उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. अशा अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगात तेथे उपस्थित असलेले पोलिस शिपाई सतीश करले मदतीला धावून आले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे रिक्षातच या महिलेची सुखरूप प्रसूती झाली.
पोलिस शिपाई सतीश करले यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तत्काळ रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधला. माहिती मिळताच डॉ. शुभम साळवे यांनी क्षणाचाही विलंब न लावता रिक्षाजवळ पोहोचून आवश्यक ती वैद्यकीय मदत पुरवली. या तत्परतेमुळे आणि योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे माता आणि नवजात बाळ या दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. पोलिसाच्या या मानवी दृष्टिकोनाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विष्णूनगर पोलिस ठाण्यातील पोलिस शिपाई सतीश करले हे शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सुरक्षेसाठी तैनात होते. रुग्णालय परिसरात फेरफटका मारत असताना प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या रिक्षातून त्यांना महिलेच्या किंकाळ्या ऐकू आल्या. त्यांनी तातडीने रिक्षाकडे धाव घेतली. त्या वेळी महिलेला असह्य प्रसूतीवेदना होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
प्रसूतीची प्रक्रिया सुरू झाली होती आणि बाळाचा काही भाग बाहेर आला होता. महिलेचा पतीही मदतीसाठी विनवणी करीत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून करले यांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना बोलावले. डॉ. शुभम साळवे यांनी तातडीने रिक्षाजवळ पोहोचून आवश्यक वैद्यकीय मदत केली. त्यामुळे रिक्षातच महिलेची सुखरूप प्रसूती झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com