वृक्षतोडीबाबत फेक नॅरेटिव्ह; ३ हजार मेगावॅटचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यावरणपूरक"

वृक्षतोडीबाबत फेक नॅरेटिव्ह; ३ हजार मेगावॅटचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यावरणपूरक"
Published on: 

वृक्षतोडीबाबत फेक नॅरेटिव्ह!
टोरंट प्रकल्प पर्यावरण पूरकच; मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २५ : कर्जत तालुक्यात प्रस्तावित असलेल्या टोरंट पॉवरच्या जलविद्युत प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीवरून विरोधक ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवत आहेत. हा प्रकल्प पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि हरित ऊर्जा निर्माण करणारा आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. पनवेल येथील कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली.
सुमारे तीन हजार मेगावॉट क्षमतेच्या टोरंट प्रकल्पातून महाराष्ट्राची विजेची गरज पूर्ण होण्यास मदत होणार आहे. टोरंट कंपनीने वन विभागाला प्रकल्पाच्या बदल्यात तिप्पट जागा दिली आहे. वन विभागातर्फे त्या जागेवर तब्बल ९० हजार झाडे लावली जाणार आहेत. तीन हजार मेगावॉट वीजनिर्मितीसाठी औष्णिक ऊर्जेचा वापर केला, तर त्यातून ४० लाख गाड्यांएवढे प्रदूषण निर्माण होईल. त्यासाठी २८ कोटी झाडे लावावी लागतील. म्हणून स्वच्छ ऊर्जा प्रकल्पांची गरज आहे. या प्रकल्पामुळे भीमाशंकर अभयारण्य किंवा मंदिराला कोणताही धोका नाही. हा प्रकल्प भीमाशंकर जंगलापासून १६ किलोमीटर आणि मुख्य मंदिरापासून २० किलोमीटर अंतरावर आहे. १८ महिने कायदेशीर प्रक्रिया आणि जनसुनावण्या झाल्यानंतर हा प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पामुळे कोणाचीही उपजीविका हिरावली जाणार नाही. स्थानिकांच्या मनात काही प्रश्न असल्यास सरकार निश्चितच त्यांच्याशी चर्चा करेल; मात्र राजकीय स्वार्थासाठी प्रकल्पाविरोधात अपप्रचार करणे हे महाराष्ट्रविरोधी पाऊल असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com