

महिलांच्या उत्साहाला पैठणीची भेट
‘सकाळ’च्या नवरात्र नवरंग स्पर्धेतील विजेत्यांचा दादरमध्ये गौरव
प्रभादेवी, ता. २६ (बातमीदार) ः महिलांच्या कलागुणांना आणि उत्सवातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘सकाळ’ने घेतलेल्या नवरात्र नवरंग स्पर्धेतून महिलांना पैठणी जिंकण्याची संधी मिळाली. हा नारीशक्तीचा सन्मान असल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.
नवरात्रीचा नवरंग, महिलांचा उत्साह आणि पैठणीचा सन्मान यांचा सुंदर संगम साधणारी नवरात्र नवरंग ही स्पर्धा ‘सकाळ’ने पेठाणी एन एक्स यांच्या सहयोगाने घेतली होती. याचा बक्षीस वितरण सोहळा दादर (पू) येथील पेठाणी एन एक्स या शोरूममध्ये सोमवारी (ता. २६) पार पडला.
मुंबईच्या कानाकोपऱ्यातून शाळा, महाविद्यालये, ट्रेनचे ग्रुप, रुग्णालयाच्या ग्रुपनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. या बक्षीस सोहळ्यात पेठाणी एन एक्सचे मालक रोहन गोर यांच्या हस्ते विजेत्या महिलांना पैठणी साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त दाद दिली.
बक्षीस वितरण सोहळ्याला आलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू उमलले होते. बक्षीस मिळणार या भावनेने सर्वजणी भावुक झाल्या होत्या. पैठणी म्हणजे आमचा वीक पॉइंट. त्यात मुकुट मिळणे आणि वर्तमान पत्रात फोटो येणे हे आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे, पैठणी साडी मिळणे म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच, अशा प्रतिक्रिया महिलांनी दिल्या.
‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाने वेळोवेळी महिलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त कार्यक्रम राबविले आहेत. ते स्तुत्य असेच आहेत.
- विद्या शेट्ये, विजेती
हा ‘सकाळ’ने केलेला स्त्रीशक्तीचा सन्मान आहे. असेच कार्यक्रम राबवत रहावे आणि पुढच्या वर्षी अजून भरघोस बक्षीस जिंकण्याची संधी द्यावी.
- संगीता पाटील, विजेती
‘सकाळ’ वृत्तपत्र समूहाने स्पर्धेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान करण्याची संधी आम्हाला दिली त्याबद्दल ‘सकाळ’चे मनःपूर्वक धन्यवाद. असेच कार्यक्रम राबवण्यात यावेत आणि त्यात आम्हालाही सहभागी करून घ्यावे.
- रोहन गोर, मालक, पेठाणी एन एक्स
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.