

आचार्य भिसे विद्यालयाचे क्रीडा स्पर्धेत यश
पालघर जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
कासा, ता. २६ (बातमीदार) : पालघर जिल्हास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कासा येथील पूज्य आचार्य भिसे विद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. तीन खेळाडूंनी प्रथम, तर दोघांनी द्वितीय क्रमांक पटकावला. या खेळाडूंची मुंबई विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बोईसर येथील तारापूर विद्यामंदिरात झालेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या १०० मीटर अडथळा शर्यतीत अस्मिता लखमा माळी, मुलांच्या ११० मीटर अडथळा शर्यतीत धनेश सुभाष माळी आणि १७ वर्षांखालील मुलांच्या उंच उडीत शुभम लहानू वाजे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
१७ वर्षांखालील मुलांच्या गोळाफेक व थाळीफेक या दोन्ही प्रकारांत अजित बंडू गडग, तर १४ वर्षांखालील मुलांच्या उंच उडीत सिद्धार्थ विजय खेवरा यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षांखालील मुलींच्या उंच उडी आणि तीन हजार मीटर चालण्याच्या प्रकारात सोनू प्रकाश लाडवी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला. क्रीडा शिक्षक डॉ. नीलेश आत्माराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी हे यश मिळविले. त्यांच्या कामगिरीबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनघा गायकवाड व उपमुख्याध्यापक विलास चौरे यांनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.