

हेल्मेट न वापरणाऱ्यांवर कारवाई
२५ दिवसांत २९ लाख ७६ हजारांचा दंड वसूल
अलिबाग, ता. २६ (वार्ताहर) : रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी रायगड पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरोधात कारवाई तीव्र केली आहे. १ ते २५ ऑक्टोबरदरम्यान जिल्ह्यातील दोन हजार ९७६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातून २९ लाख ७६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, दुचाकीस्वारांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
गेल्या काही वर्षांत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे आणि हेल्मेट न वापरणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. त्यामुळे रायगड पोलिसांनी हेल्मेटसक्तीची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
तरुणांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि वाहतूक शाखेतर्फे शाळा, महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्ये आणि मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन केले जात आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालवल्यास मोटार वाहन कायद्यानुसार एक हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जातो.
खबरदारी आवश्यक
दुचाकी चालवताना हेल्मेट वापरल्याने अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका कमी होतो. वाहतुकीचे नियम पाळणे, वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षित पद्धतीने वाहन चालवणे आवश्यक आहे. दंडात्मक कारवाईच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रत्येक दुचाकीस्वाराने हेल्मेट वापरावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.