नवीन व्यासपीठ ११ कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन

नवीन व्यासपीठ ११ कला-क्रीडा स्पर्धांचे आयोजन
Published on: 

ज्येष्ठांच्या कलागुणांना व्यासपीठ
फेसकॉमतर्फे वार्षिक कला-क्रीडा स्पर्धेचे आयोजन

नेरूळ, ता. २७ (बातमीदार) : निवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, उत्साही आणि सृजनशील बनविण्यासह ज्येष्ठ नागरिकांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी फेडरेशन ऑफ सीनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र (फेसकॉम) यांच्या मुंबई प्रादेशिक विभागातर्फे वार्षिक कला-क्रीडा स्पर्धा २०२६-२७ चे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धिबळापासून नृत्य, गायन, काव्यवाचन आणि कॅरमपर्यंतच्या ११ स्पर्धांमध्ये ज्येष्ठांना आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमामुळे ज्येष्ठांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळण्यासोबतच त्यांच्यातील उत्साह आणि सामाजिक सहभाग वाढण्यास मदत होणार आहे.

वयाची साठी ओलांडल्यानंतरही अनेक ज्येष्ठ नागरिकांमध्ये विविध कलागुण, बौद्धिक क्षमता आणि क्रीडा कौशल्ये दडलेली असतात, मात्र त्यांना आपली कला सादर करण्यासाठी पुरेसे व्यासपीठ मिळत नाही. ही उणीव दूर करण्यासाठी फेसकॉमतर्फे दरवर्षी या स्पर्धांचे आयोजन केले जाते. स्पर्धांच्या माध्यमातून ज्येष्ठांना आपल्या आवडी जोपासता येणार असून, समवयस्कांशी संवाद साधण्यासह नवीन मैत्रीचे बंधही निर्माण करता येणार आहेत.

यंदाच्या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, एकल नृत्य, समूह नृत्य, कथाकथन, नाट्य अभिवाचन, काव्यवाचन, कराओके गायन, निबंध लेखन, कॅरम, ब्रिज आणि वेशभूषा अशा एकूण ११ प्रकारांचा समावेश आहे. कला, साहित्य, संगीत आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रांतील आवड जपणाऱ्या ज्येष्ठांना या स्पर्धांमध्ये सहभागी होता येणार आहे.

स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघांच्या सभासदांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन फेसकॉमच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष सुरेश पोते यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com