

मुलुंडमध्ये पाण्याच्या टँकरमुळे वाहतूक कोंडी
उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
मुलुंड, ता. २७ (बातमीदार) : मुलुंड पश्चिमेतील वल्लभभाई पटेल मार्ग आणि कस्तुरबा मार्ग परिसरात दिवसभर पाण्याचे टँकर येत असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामुळे स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, ही समस्या तातडीने सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
पाण्याच्या टँकरची सतत वर्दळ असल्याने परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच पदपथ आणि गटारांच्या झाकणांचेही नुकसान होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे अपघातांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी संबंधित प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. मुलुंड वाहतूक विभागाकडे तक्रार केल्यानंतर त्याचे त्वरित निराकरण केले जाते, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही वाहतूक विभाग ही समस्या मार्गी लावेल, अशी आशा सामाजिक कार्यकर्ते सुनील गारे यांनी व्यक्त केली.
समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली असून, वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच टी विभागाच्या पालिका प्रशासनाशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली जाईल, असे मुलुंड वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश तांबे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.