

परदेशी शिक्षणाच्या संधींची विद्यार्थ्यांना ओळख
आगरवाडीत करिअर मार्गदर्शन शिबिर
पालघर, ता. २७ (बातमीदार) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यांना करिअरची योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने डी सोल्युशन स्टडी अब्रॉडतर्फे आगरवाडी येथील लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालय व अनंत जनार्दन वर्तक कनिष्ठ महाविद्यालयात परदेशी शिक्षण व करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
दहावी, अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विविध डिप्लोमा अभ्यासक्रम, परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी तसेच मॉरिशस येथील स्टीफन बिझनेस स्कूलमधील शैक्षणिक अभ्यासक्रमांची माहिती देण्यात आली. जागतिक स्तरावरील शिक्षणाचे पर्याय, करिअरच्या नव्या दिशा आणि भविष्यातील संधी यांविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणाच्या संधींची माहिती मिळवून देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे आणि जागतिक स्तरावर करिअर घडविण्यासाठी प्रेरित करणे, हा शिबिराचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती मिळाली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष राजाराम म्हात्रे, कार्याध्यक्ष चिंतामण ठाकूर, विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, प्रशासकीय अधिकारी आणि ज्येष्ठ समाजसेवक पंकज म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. डी सोल्युशन स्टडी अब्रॉडच्या पथकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.