धावत्या रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ

धावत्या रेल्वेत चोरट्यांचा धुमाकूळ
Published on: 

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : गर्दीची लोकल, स्थानकावरील धावपळ आणि लांब पल्ल्याच्या गाडीतील प्रवास याच गडबडीचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांत एकूण तीन लाख ४९ हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. ठाण्यातील घटनेत संशयित महिलेला साध्या वेशातील महिला पोलिसांकडून पकडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक दोनवर साेमवारी (ता. २६) सायंकाळी साक्षी चव्हाण (वय २५) या कल्याण लोकलमध्ये चढत होत्या. लोकल उशिराने धावत असल्याने फलाटावर गर्दी होती. याच संधीचा फायदा घेत एका महिलेने साक्षी यांच्या गळ्यातील ७० हजारांची सोनसाखळी खेचली. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर साध्या वेशातील महिला पोलिसांनी संशयित महिलेला पकडले. वैशाली माडगुळ (४०, रा. मुंब्रा) असे तिचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळवा स्थानकात २३ ऑक्टोबरला सकाळी रशीदा शेख (५५) या सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमध्ये चढत असताना गर्दीत पडल्या. डब्यात चढल्यानंतर त्यांची पर्स गायब झाल्याचे लक्षात आले. पर्समध्ये दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजार रुपयांचा ऐवज होता. महेश चव्हाण (५४, रा. कणकवली, सिंधुदुर्ग) हे पत्नीसह बंगळुरू एक्स्प्रेसमधून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान झोपेचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या ट्रॉलीबॅगचे कुलूप तोडत एकूण दोन लाख ३४ हजारांचा ऐवज चोरीला गेला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com