

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २७ : कोलशेत येथील आदिवासी जमीन बिगरआदिवासी व्यक्तीला विकण्याचे आश्वासन देऊन जमीन खरेदीच्या व्यवहारात १८ कोटी ४६ लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. जमीन मालकासह मध्यस्थाने पैसे स्वीकारल्यानंतर जमिनीची मालकी हस्तांतरित केली नाही, तसेच रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी संबंधितांविरोधात कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोविंदराम पटोडिया यांना ठाण्यात जमीन खरेदी करायची असल्याने २०१३ मध्ये कोलशेत येथील जमीनमालक विश्वास वळवी यांच्याशी त्यांची ओळख करून देण्यात आली. वळवी यांनी सर्वेक्षण क्रमांक २८२/१ मधील सुमारे १.६७ हेक्टर जमीन आदिवासी ते बिगरआदिवासी हस्तांतरित करण्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मध्यस्थ बसंतराज सेठिया यांनीही या व्यवहाराची हमी दिल्याने पटोडिया यांनी जमीन खरेदीचा प्रस्ताव स्वीकारला. जमिनीचा व्यवहार १८ कोटी ४६ लाखांमध्ये ठरला. त्यानुसार, २०१५ मध्ये जमीन मालकाला तीन कोटी ४० लाख, तर २०१६ मध्ये १५ कोटी सहा लाख देण्यात आले. जमीन विक्रीसाठी प्रतिज्ञापत्रही करण्यात आले. मात्र, जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याऐवजी वळवी यांनी २०१८ मध्ये पूर्वीचा परवानगी अर्ज मागे घेण्याची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, संबंधित जमीन अन्य कंपनीच्या माध्यमातून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.